Mahavitran Bharti 2024.
Mahavitran Bharti 2024 :
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये भरती निघाली असून यामध्ये एकूण 5347 पद आहेत. या भरतीचा अर्ज ऑनलाईन करायचा असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे.आणि यासाठी वयाची अट 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेले जाहिरात काळजीपूर्वक तपासून पहावे आणि नंतरच अर्ज करावा.
पदाचे नाव
विद्युत सहाय्यक
एकूण जागा
5347 जागा
शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 माध्यमिक शालांत उत्तीर्ण प्रमाणपत्र
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय परीक्षण परिषद नवी दिल्ली यांनी वीजतंत्री/ तारतंत्री अथवा इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
Mahavitran Bharti 2024
वयाची अट
दिनांक 29/12/2023 अखेर वयोमर्यादा
उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 27 वर्ष असणे आवश्यक आहे
मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा पाच वर्षे सूट राहील
दिव्यांग उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत राहील.
माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षापर्यंत राहिल.
वयोमर्यादा साठी एसएससी प्रमाणपत्रावर दर्शवलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा शुल्क
उमेदवाराने खालील प्रमाणे परीक्षा शुल्काची रक्कम भरावी
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी | मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारांसाठी |
Rs. 250 + GST | Rs. 125 + GST |
उमेदवाराने वर दर्शविल्याप्रमाणे आवेदन शुल्क क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आणि इंटरनेटनेट बँकिंग द्वारे भरावयाचे आहे. कोणत्याही कारणास्तव ते परत केले जाणार नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख
20 मार्च 2024
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा?
महत्त्वाच्या भरत्या
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती शेवटची तारीख आणि अजून माहितीसाठी क्लिक करा>>>>>>
गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित>>>>>
महाराष्ट्र पोलीस विभागात सतरा हजार पदांची मेगा भरती लवकर अर्ज करा अधिक माहितीसाठी क्लिक करा
Mahavitran Bharti 2024
निवड पद्धती
अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ( Objective Type) ऑनलाइन तंत्रिक क्षमताा चाचणी घेण्यात येईल.सदर चाचणी ही पदासाठी आवश्यक असलेले किमान अहर्ता सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारित राहील.परीक्षेच्या माध्यम मराठी/ इंग्लिश राहील. ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाइन तांत्रिक क्षमता चाचणी करिता बोलवण्यात येईल.
उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी व त्याच्या पात्रतेची पडताळणी ऑनलाइन तंत्रिक क्षमताा चाचणी होण्यापूर्वी केली जाणार नाही. त्यामुळे परीक्षेला बोलाविले म्हणजे उमेदवार त्या पदासाठी पात्र आहे असे समजले जाणार नाही. तथापि निवड झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी नेमणुकी पूर्वी करण्यात येईल. ऑनलाइन अर्ज मध्ये दर्शविलेल्या माहितीपृष्ठ योग्य ते दस्तऐवज जमा करणे हे यशस्वी उमेदवाराची जबाबदारी राहील अन्यथा त्याची निवड रद्द करण्यात येईल.
ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे
अनुक्रमांक | विषय | प्रश्न | गुण |
1. | तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान | 50 | 110 |
2. | सामान्य अभियोग्यता अ) तर्कशक्ती ब) संख्यात्मक अभियोग्यता क) मराठी भाषा | 40 20 20 | 20 10 10व् |
एकूण गुण | 130 | 150 |
उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत 150 पैकी प्राप्त गुणांचे रूपांतर 90 गुणात करून त्यामध्ये बाह्य स्त्रोत कंत्राटी कामगारांना दहा गुणांपैकी अनुभवाप्रमाणे प्राप्त अतिरिक्त गुण असे एकूण 100 गुणांपैकी एकूण प्राप्त गुणांच्या आधारे निवड यादी तयार करण्यात येईल
निवड सूची तयार करताना ज्या उमेदवाराचे गुण समान असतील अशा बाबतीत उमेदवाराची जन्मतारीख विचारात घेतली जाईल या उमेदवाराचे वय जास्त असेल त्याला प्राधान्यक्रमण्यात येईल.
दस्तऐवज सादर करण्याच्या कालावधीमध्ये उमेदवाराने दस्तऐवज सादर न केल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल
Mahavitran Bharti 2024
अर्ज करण्याची पद्धत
उमेदवारांची माहिती संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याने नमुना अर्ज व माहिती waw.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकतात. यासोबत दिलेले लिंक वर ऑनलाइन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवाराने नित्य वापरात असेल असा स्वतःचा ईमेल आयडी व स्वतःचा मोबाईल नंबर अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज मध्ये वैयक्तिक माहिती, संपर्क कक्षेत इतर माहिती, शैक्षणिक अहर्ता इत्यादी संदर्भातील तपशिलाची अचूक नोंद करावे.
उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी करिता स्वतंत्रपणे आवेदन पत्र पाठवण्यात येणार नाही. उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळावरून आवेदन पत्र डाऊनलोड करून घेणे त्यामध्ये माहिती भरावयाची आहे. ऑनलाइन तंत्रिक क्षमता चाचणी हे अमरावती संभाजीनगर कोल्हापूर मुंबई नगर ठाणे नवी मुंबई नागपूर नाशिक पुणे इत्यादी ठिकाणी घेण्यात येईल .
शासकीय निमशासकीय महामंडळ इतर कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज त्यांचे कार्यालय प्रमुखांच्या परवानगीने भरावे व अशा परवानगीची प्रत कागदपत्रे पडताळणी वेळी उपलब्ध करावे.
Mahavitran Bharti 2024
इतर अटी
जाहिराती दर्शन घेण्यात आलेले अहर्ता ही किमान अहर्ता आहे आणि ही केवळ अहर्ता हाच निकष मानून उमेदवार संबंधित पदाच्या निवडीसाठी पात्र ठरू शकणार नाही उमेदवार हा महाराष्ट्रातील आदिवासी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मराठी भाषेबाबतचे ज्ञान असल्याचाचा पुरावा म्हणून उमेदवाराने खालील प्रमाणपत्रे कागदपत्रे तपासणी सादर करणे आवश्यक आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा एसएससी प्रमाणपत्र निवड झालेल्या उमेदवारांना Mahavitran Bharti 2024 कंपनीच्या सेवेत तीन वर्षाचा कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यानंतर तंत्रज्ञ या पदावर अनुशेष आणि रिक्त पदे यांच्या अनुषंगाने सामावून घेतल्या जाईल. तंत्रज्ञ पदावर रुजू झाल्यानंतर ते मूळ वेतन व्यतिरिक्त महागाई भत्ता, घर भाडे भत्ता व इतर भत्ते इत्यादी कंपनीच्या नियमाप्रमाणे मिळण्यास पात्र ठरतील. भरती प्रक्रिये दरम्यान जर एखाद्या उमेदवाराने सादर केलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अशा उमेदवाराचा अर्ज भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात अपात्र ठरवण्यात येईल. याकरिता उमेदवार सर्वस्व जबाबदार असेल. त्या अनुषंगाने उमेदवाराने खरी व अचूक अशी माहिती अर्जामध्ये नमूद करावी. भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने कोणत्याही मार्गे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याबाबत उचित कार्यवाही करण्यात येईल. जाहिरातीतील पदांची भरती प्रक्रिये बाबतचा कंपनीचा निर्णय अंतिम असून त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार वैयक्तिक पातळीवर कोणाचीही केला जाणाराही Mahavitran Bharti 2024 भरती प्रक्रियेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. Mahavitran Bharti 2024 मध्ये निवड झालेल्या उमेदवारास रिक्त पदांनी अनुशेष याचा अनुषंगाने परिमंडल कार्यालयाकडे सविस्तर पदस्थापने करिता वर्ग करण्यात येतील. अशा उमेदवारांना परिमंडळाच्या कार्यक्षेत्रातील कोणतेही कार्यालयाच्या ठिकाणी कंपनीच्या निगडीनुसार नियुक्त करण्यात येईल. याबाबत कंपनीचा निर्णय अंतिम राहील. सदर पदाचे प्रतीक्षा यादी तयार करणे याचा अंतिम निर्णय महावितरण कंपनीचा राहील. जाहिरातीमधील प्रसिद्ध केलेल्या पदाच्या 50% पर्यंत प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. सर्वसाधारणपणे निवड यादी मधील कागदपत्रे पडताळणी अंति गैरहजर अपात्र इत्यादीमुळे राहिलेल्या जागे करिता प्रतीक्षा यादी कार्यानवेत करण्यात येईल. प्रतीक्षा यादी कार्यान्वित केल्यानंतरही जाहिरातीचे पदे अथवा कंपनीमधील सदर पदाचे रिक्त पदे शिल्लक राहिल्यास ते पदे कंपनीच्या निगडीनुसार पुढील भरती प्रक्रिये करिता ओढण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. निवडीच्या कोणत्याही टप्प्यातत उमेदवार विहीत आहात धारण करीत नसल्याने किंवा त्याचे पूर्वीचे चारित्र्य गैरवर्तवणुकीचे आढळल्यास त्याची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. तसेच अशा उमेदवाराचे नियुक्ती झाल्यास त्याचे नियुक्ती समाप्त करण्यात येईल. आरक्षणासंबंधातील उपरोक्त शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत waw.maharashtra.gov.in Mahavitran Bharti 2024 भरती प्रक्रियेची संबंधित माहिती वेळोवेळी कंपनीच्या waw.mahadiscom.in या संकेतस्थळावर करियर या सदरा खाली प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित उमेदवारांनी भरती प्रक्रिये संबंधीच्या अद्यावत माहितीसाठी कंपनीचे संकेत स्थळ वेळोवेळी पाहावे.
Mahavitran Bharti 2024